संचलनाने उद्या सांगता: वॉक,सायकल फॉर हेल्थसह सांस्कृतिक,मनोरंजन कार्यक्रमाने रंगत
नाशिकः वेगळ्या उपक्रमासाठी प्रसिध्द असलेल्या सेंट्रल हिंदु मिलीटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोसला मिलीटरी कॉलेजने स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमांद्वारे सप्ताह साजरा केला. या सप्ताहात कुठल्याही डे
ला प्राधान्य न देता फ्क्त देशभक्तीपर उपक्रम राबविले. वॉक फॉर हेल्थ,सायकल फॉर हेल्थसह रांगोळी,निबंध,वक्तृत्व,चित्रकला,गीतगायन यातही देशभक्तीच्या विषयांना प्राधान्य दिले होते. मनोरंजन, सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांनीही सक्रीय भाग घेतला. या उपक्रमांची सांगता, बक्षिस वितरण आणि संचलन रविवारी(ता.२२)सकाळी आठ ते साडेदहा यावेळेत होत आहे. त्यासाठी नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे या प्रमुख पाहुण्या असतील.
या उपक्रमांची सुरवात परिसरात असणाऱ्या प्रभू श्री राम मंदिरातील रामांच्या महापूजनाने झाली. यंदा निवृत्त होणाऱ्या सर्व प्राध्यापकांच्या हस्ते ही पुजा करण्यात आली आणि त्यांचा सन्मान करण्यात आला.
उत्तम आरोग्यासाठी वॉक फॉर हेल्थ,वॉक फॉर सायकल
परिसरातील रणगाड्यापासून वॉक फॉर हेल्थची सुरवात झाली. भोसला गर्ल्स स्कूल, डॉ.मुंजे निवासस्थानामार्गे पुन्हा कॉलेज असा मार्ग होता, त्यात विविध विभागप्रमुख,प्राध्यापकांसह 180 विद्यार्थी 70 एनसीसीच्या तर 50 एनडीएच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला. सायकल फेरीतही चांगला प्रतिसाद लाभला. कॉलेज ते स्कूल अशा दहा फेरी मारल्यानंतर रॅलीची सांगता झाली.
देशभक्ती गीतांतून अनोखा जागर
सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी प्रसिध्द संगीतकार संजय गीते,मकरंद हिंगणे हे प्रमुख पाहुणे होते, त्यांच्यासमोर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. मेघालयाच्या सादर केलेल्या गीतांना तसेच कथ्थक आणि नटराजवंदनेने या कार्यक्रमात अनोखी रंगत आणली.श्री.हिंगणे आणि गीते यांनी गीत सादर करण्याबरोबरच कॉलेजच्या उपक्रमांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. कॉलेज कमिटीचे अध्यक्ष हेरंब गोविलकर,कॅम्पस को-ऑर्डिनेटर,डॉ.संजय कंकरेज,कॅटो कर्नल रामकुमार नायर आदींची प्रमख उपस्थितीती होती. श्री.हिंगणे,गीते यांच्याहस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. गायत्री जोशी यांनी सुत्रसंचालन केले, प्रियंका गावीत यांनी आभार मानले, कु.श्रावणी गीते यांच्या वंदेमातरम् या गायनाने सांस्कृतिक कार्यक्रमांची सांगता झाली.
विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांचाही सहभाग
विद्यार्थी,शिक्षकांच्या कलागुणांना वाव मिळावा,यासाठी विविध मनोरंजनाचे कार्यक्रम घेण्यात आले. सर्वच कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या जोडीला शिक्षकांनी सहभाग नोंदवला.खाद्य पदार्थाच्या स्टॉलचे उद्घाटन संस्थेच्या नाशिक विभागाचे कार्यवाह सीएमए हेमंत देशपांडे यांनी केले. या स्टॉलवर विविध पदार्थांची रेलचेल दिसली. खाद्यपदार्थ स्पर्धा तसेच चमचा लिंबू,पासिंग द बॉल,बास्केटमध्ये बॉल टाकणे,संगीत खुर्ची,क्रिकेट स्पर्धेतील विजेत्यांना श्री.देशपांडे यांनी तर एनसीसी,एनएसएस,क्रीडा,सांस्कृतिक विजेते,विविध परिक्षांमध्ये यश मिळविणारे विद्यार्थी,शिक्षक यांना बीवायकेचे क्रीडासंचालक डॉ.सुनिल मोरे, कॉलेज कमिटीचे अध्यक्ष हेरंब गोविलकर आदींच्या हस्ते गौरविण्यात आले. या उपक्रमांसाठी प्राचार्य डॉ. उन्मेष कुलकर्णी, उपप्राचार्य श्री. जगदीश भावसार,कॅम्पस को-ऑर्डिनेटर,कॅटो यांच्यासह सर्व विभागप्रमुख,शिक्षक,प्राध्यापक यांचे सहकार्य लाभले. स्नेहसंमेलन प्रमुख कू. हिंगे (वरीष्ठ विभाग), व सौ. राजदेरकर (कनिष्ठ विभाग) व समन्वयक योगेश भदाणे यांनी उपक्रमांचे नियोजन