दि- 12/1/2023 गुरुवार रोजी नाशिक येथे कार्यशाळा मंत्रालय पुरवठा विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. 1) भारतीय खाद्य निगम यांच्याकडून धान्याची उपलब्धता करून घेणे ,2) राज्यातील परवानाधारकांना दर महिना धान्याचा कोठा उपलब्ध करून देणे 3)धान्याचा कोठा वाहतूक ठेकेदार व हमालीमुक्त करणेबाबत 4) epos मशीनवर धान्य वितरण सुरळीत होण्याकरता चांगल्या प्रतीचे epos मशीने व NIC माध्यमातून नेटवर्क जलद गतीने मिळण्याकरता कार्यवाही करणे 5)दरमहा परवानाधारकांना वितरित होणारी मार्जिन वेळेत उपलब्ध करून देणे.
विजय वाघमारे प्रधान सचिव महाराष्ट्र राज्य, श्री गंगाधरन डी जिल्हाधिकारी नाशिक, श्री सतीश सुपे जॉईन सेक्रेटरी, चारुशीला तांबेकर, नेत्रा मानकामे, गणेश कोळेकर उपसचिव, श्री आशिष आतराम, महेश जाधव कक्ष आधिकारी व इतर प्रशासकीय वर्ग
या कार्यशाळेच्या कार्यक्रमात सर्व विभागीय उपायुक्त पुरवठा विभाग, सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी, व अन्नधान्य वितरण अधिकारी तसेच नाशिक जिल्हाधिकारी पुरवठा संबंधीत सर्व प्रशासकीय वर्ग महाराष्ट्र फेडरेशनच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी
श्री गणपतराव डोळसे पाटील राज्य अध्यक्ष महाराष्ट्र फेडरेशन, श्री बाबुराव म्हम्माने जनरल सेक्रेटरी, श्री निवृत्ती कापसे नाशिक जिल्हा अध्यक्ष,
फारुख हुसेन नाशिक शहर अध्यक्ष, श्री योगेश बत्तासे ग्राहक संरक्षण कमिटी, श्री संतोष सोनवणे निफाड तालुका अध्यक्ष, रमेश मुळे सेक्रेटरी आदी उपस्थित होते.