जागतिक बाजारामध्ये अजूनही परिस्थिती चांगली नसल्यामुळे त्याचे परिणाम आज भारतीय बाजारावर दिसणार असा अंदाज विश्लेषकांनी अगोदरच वर्तवलेला होता. येणाऱ्या दिवसांमध्ये अमेरिकेमधून महागाईचे आकडे तसेच व्याजदर वाढणार की काय व यावरून भारतामध्ये रिझर्व बँक अधेमधेच मध्येच व्याजदर वाढवणार की काय याची भीती तसेच या महिन्यांमध्ये तिमाही निकालाची आकडे येणार आहेत यामुळे गुंतवणूकदार थांबा आणि पहा या धोरणावरती ठाम आहेत.
![विकली एक्सपायरी,दोलायमान परिस्थिती, निर्देशांक लाल. 12 जानेवारी शेअरबाजार आढावा लेखक प्रसाद जोशी. 2 share market post](https://i0.wp.com/nashikfast.com/wp-content/uploads/2022/11/share-market-post-.jpeg?resize=640%2C905&ssl=1)
यातच परदेशी वित्तीय संस्था या सतत विक्री वाढवत आहेत व त्यांना जास्तीत जास्त बाजार कोसळावा असे वाटत असेल व त्यावरून त्यांना कमीत कमी भावामध्ये शेअर्स खरेदी करता येतात का हे कदाचित वाटत असेल त्यावरून सुद्धा बाजार आज खूपच दोलायमान परिस्थितीमध्ये होता. खरे तर सकाळी निफ्टी व इतर निर्देशांक हे हिरव्या रंगांमध्ये उघडलेले होते परंतु आज गुरुवार विकली एक्सपायरी असल्यामुळे बाजार बाजार खूपच दोलायमान परिस्थितीमध्ये होता व बाजाराला कोणत्याही प्रकारची दिशा मिळत नव्हती. परंतु दुपारनंतर दोलामान परिस्थिती अजून वाढली व निर्देशांक कमी जास्त वाढ घट होऊन शेवटी 37 अंकांनी बंद होऊन परत एकदा अठरा हजाराच्या खालीच राहिला.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स सुद्धा आज 147 अंकांनी घसरून परत एकदा 60000 च्या खाली ट्रेड करायला सुरुवात झाली. आज दिवसभराच्या काही काळामध्ये निफ्टी व निफ्टी बँक हे दोन वेगवेगळ्या दिशेला होते काही काळ निफ्टी बँक वरती होता तर निफ्टी फिफ्टी हा खाली ट्रेड करत होता काल सुद्धा निफ्टी बँक आणि निफ्टी ची दिशा वेगवेगळी होती.
परंतु आज निफ्टी बँक सुद्धा 150 अंकांनी घसरून 42082 वर बंद झाला. निफ्टी बँक साठी बेचाळीस हजार सुद्धा पातळी महत्त्वपूर्ण आहे.
इन्फोसिस या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कंपनीने त्यांचे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले व हे आर्थिक निकाल मार्केटला जेवढी अपेक्षा होती त्यापेक्षाही चांगले निकाल आहेत. इन्फोसिसने त्यांच्या तिमाही मध्ये 13.4% ची वाढ दर्शवलेली आहे देशातील प्रमुख इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कंपनी असलेल्या इन्फोसिसने मागच्या वर्षी याच कालावधीमध्ये 5809 कोटी रुपये नफा कमवला होता जो यावर्षी 6586 कोटी रुपये आहे. कंपनीला जे उत्पन्न मिळालेले आहेत त्यामध्ये सुद्धा जवळपास 20% ची वाढ झालेली आहे. इन्फोसिस या कंपनीचे आर्थिक निकाल उत्तम असल्यामुळे उद्या कदाचित याचे पडसाद मार्केट वर पडून उद्या मार्केट गॅप ओपन होण्याची शक्यता आहे असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. तसेच मागील काही दिवसांमध्ये आपण जो काही ट्रेंड बघत आहोत त्यानुसार सध्या निर्देशांकांमध्ये काय प्रकार आहे तर सेल ऑन एवरी राईज म्हणजे जसा निर्देशांक वाढतो तसा लगेच गुंतवणूकदार किंवा ट्रेडर झालेला नफा बुक करून परत निर्देशांकाला पहिल्या पातळीत आणतात.
दुसरी चांगली इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कंपनी म्हणजे एच सी एल या कंपनीने सुद्धा चांगले आर्थिक निकाल घोषित केले आहेत व या कंपनीने एन्ट्रीम डिव्हिडंट दहा रुपये प्रति शेअर मागे जाहीर केला असून याची रेकॉर्ड 20 जानेवारी 2023 आहे.
अमेरिकन सरकारचे महागाईचे आकडे जाहीर झाले असून डिसेंबर महिन्यासाठी महागाईचा दर 6.5 % आहे हा जरी दर तसा योग्य वाटला असला तरी त्यांना यापेक्षाही कमी महागाई दर हवा आहे व त्यामुळे पुढील महिन्यांमध्ये अमेरिकेतील मुख्य बँक व्याजावरील दर परत वाढवण्याची शक्यता आहे.
आज बाजार जास्त कोसळला नसला तरी सुद्धा काही प्रमुख शेअर्समध्ये खूप मोठी घसरण बघायला मिळाली त्यामध्ये रिलायन्स या कंपनीमध्ये आज बरीच मोठी घसरण बघायला मिळाली. रिलायन्स आज जवळपास दोन टक्के म्हणजे 55 रुपयाने घसरलेला होता व रिलायन्स परत एकदा 2500 रुपयांच्या खाली ट्रेड करत आहे.
ॲक्सिस बँक कोटक महिंद्रा बँक यामध्ये सुद्धा आज एक एक टक्क्याची घसरण बघायला मिळाली. ॲक्सिस बँक परत एकदा 950 रुपयाच्या खाली ट्रेड करायला सुरुवात झालेला आहे. प्रमुख बँकेपैकी आयसीआयसीआय बँक सुद्धा काही प्रमाणात घसरत चालले असून ही बँक सुद्धा 870 रुपयाच्या खाली ट्रेड करत आहे.
डिव्हिस लॅबोरेटरी बीपीसीएल आणि टाटा मोटर ह्या शेअर्समध्ये सुद्धा आज बरीच घसरण बघायला मिळाली.
तर एसबीआय लाइफ इन्शुरन्स, अल्ट्राटेक सिमेंट, लार्सन अँड टुब्रो या कंपनीचे शेअर्स आज वाढलेले होते.
नवीन क्लोराईन इंटरनॅशनल, पीव्हीआर, डिव्हिज लॅबोरेटरीज या शेअर्समध्ये आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी विक्रीचे व्यवहार झालेत.
निफ्टी ला आता 17800 तर बँक निफ्टी ला 42000 तर सेन्सेक्सला 59800 चा सपोर्ट आहे. या पातळीच्या खाली जर तो ट्रेड करायला लागला तर मात्र थोडीशी चिंताजनक परिस्थिती येऊ शकते. निफ्टी ला 18000 ही पातळी ओलांडण्यासाठी खूप कसरत करावी लागणार आहे कारण या पातळीवरती निफ्टी ला खूप विरोध आहे.
आयपीओ चा विचार केला तर बऱ्याच कंपन्यांचे आयपीओ आता बाजारात येत आहेत परंतु आयपीओ जरी उत्तम असले तरी बाजाराच्या परिस्थितीमुळे आयपीओला काही वेळेला चांगली मागणी येत नाही. परंतु आज चित्र जरा वेगळे दिसले. आज बाजारामध्ये SAH POLYMERS या कंपनीच्या शेअर्सची नोंदणी झाली. 65 रुपये या किमतीला हा विकलेला आयपीओ आज बाजार बंद होताना 85 रुपयाला ट्रेड करत होता. सध्या तरी नवीन कोणताही आयपीओ शेअर बाजारात येण्यासाठी उत्सुक नाही.
आयपीओच्या बाजारामध्ये नावाजलेल्या कंपनीने गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले तसेच गुंतवणूकदारांना उच्च दराने आयपीओ विकून आत्ता ज्यामध्ये जवळपास 70 ते 75 टक्के ची घट झालेली आहे असा आयपीओ म्हणजेच पेटीएम या कंपनीचा आयपीओ. या कंपनीचे जवळपास दोन कोटी शेअर्स अलीबाबा या गुंतवणूक कंपनीने दुपारी साधारण एक वाजता विकलेत व त्यामुळे हा शेअर्स मध्ये दुपारी जवळपास तीन टक्क्याची घसरण झाली. 569 रुपये किंमत असलेला शेअर लगेचच 536 वरती येऊन थांबला. या आयपीओ मध्ये बऱ्याच गुंतवणूकदारांचे हात पोळले गेलेले आहेत त्यामुळे आयपीओ मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्याचा अभ्यास करणे हे किती महत्त्वाचे आहे तसेच जर आपल्याला हा अभ्यास माहिती नसेल किंवा जमला नसेल तर शेअर बाजार शिकणे किती महत्त्वाचे आहे यावरून याची कल्पना येते. 2150 रुपये प्रति शेअर या किमतीने विकलेला एक शेअर ची किंमत आज 540 रुपये आहे. हा आयपीओ जेव्हा बाजारात येणार होता तेव्हा याबद्दलचा अहवाल मी दिलेला होता व त्या अहवालानुसार ज्यांनी कृती केली ते लोक आज मला बरेच धन्यवाद देत आहेत. ज्याप्रमाणे महागडी कार घेतल्यानंतर आपण ती कार चालवण्याकरता पैसे देऊन प्रशिक्षण घेतो त्याचप्रमाणे शेअर बाजारामध्ये गुंतवणूक केल्यानंतर प्रशिक्षण देण्यासाठी पैसे खर्च करणे हे योग्यच आहे.
प्रसार माध्यमांमध्ये आलेल्या अहवालानुसार आज ज्यांनी ब्लॉक डील करून हे शेअर्स विकलेले आहेत, या गुंतवणूकदारांनी या कंपनीमध्ये साधारण 2015 ते 2019 या कालावधीमध्ये रुपये 330 या दराने गुंतवणूक केलेली होती. पेटीएम कंपनीने त्यांचा जो दुसऱ्या तिमाहीचा आर्थिक निकाल जाहीर केला त्यानुसार त्यांना त्या दुसऱ्या तिमाही मध्ये 571 कोटी रुपयाचा तोटा आहे.
भारत सरकारने जो महागाईचा दर आज जाहीर केला तो डिसेंबर महिन्याकरता 5.72% आहे,नोव्हेंबर महिन्यामध्येच हाच दर 5.88 होता तर ऑक्टोबर मध्ये हा दर 6.77 होता. रिझर्व बँकेला हा महागाईचा दर जवळपास चार टक्के पर्यंत आणायचा आहे त्यासाठी त्यांनी काही कालावधी दिलेला आहे जर लवकरात लवकर महागाईचा दर कमी झाला तर रिझर्व बँक व्याजदर वाढवणार नाही व ही बाब शेअर मार्केट साठी खूपच आनंदाची आहे व त्यानंतर शेअर बाजार नक्कीच वाढेल असा सर्वांचा विश्वास आहे.
आपणास हा आढावा कसा वाटला ते नक्की कळवा तसेच या मध्ये अजून काही बदल तसेच अजून काही गोष्टी तुम्हाला हवे असतील तर त्या सुद्धा कळवा.
प्रसाद जोशी
खूप छान विश्लेषण