सोमवारी शेअर बाजारांमध्ये फायदे निर्माण झाले होते ते सर्व फायदे मंगळवारी जागतिक बाजारांमधील अनिश्चितता तसेच जागतिक बाजारांमधील दोलायमान परिस्थितीमुळे नाहीसे झाले. सोमवारी बाजार वधारला होता. परंतु ज्याप्रमाणे बाजाराची आता वाटचाल चालू आहे ती वाटचाल म्हणजे सेल ऑन एवरी राईज. म्हणजेच बाजार वाढला की लगेच गुंतवणूकदार ट्रेडर जो नफा असेल तो बुक करून त्यांचे वही खाते बंद करत असतात. हे म्हणजे असे झाले की रोज कमवा व रोज खा अशी परिस्थिती निर्माण केली गेली आहे.
![जागतिक बाजाराचे पडसाद : भारतीय शेअर बाजार लाल रंगात बंद, शेअर बाजार आढावा,10 जानेवारी : लेखक प्रसाद जोशी 2 share market pune adv](https://i0.wp.com/nashikfast.com/wp-content/uploads/2022/11/share-market-pune-adv.jpeg?resize=576%2C1024&ssl=1)
जर निफ्टी फिफ्टी चा विचार केला तर एक डिसेंबरला निफ्टी-फिफ्टी हा 18887 या उच्चांक पातळीवरती पोहोचलेला होता. त्यानंतर जी घसरण सुरू झाली आहे ती अद्यापही थांबलेली नाही. तांत्रिकदृष्ट्या विचार जर केला तर अजूनही निफ्टी चार्ट वरती बाय सिग्नल पूर्णतः देत नाही. 12 डिसेंबर व 23 डिसेंबर यानंतर निफ्टी मध्ये थोडीफार बाईंग स्थिती निर्माण झाली होती परंतु जसे मी वर म्हटले आहे की रोज कमवा रोज खा अशामुळे जो काही नफा दिसला तो सर्व नफा गुंतवणूकदार ट्रेडर यांनी लगेच बुक करून घेतला व परत एकदा टेक्निकली अजून तरी निफ्टी हा डाऊन ट्रेंड मध्येच आहे. व त्याचीच पुनरावृत्ती आज झाली व आज परत एकदा बहुसंख्य निर्देशांक घसरून लाल रंगात बंद झाले.
निफ्टी आज 187 अंकाने बंद होऊन परत एकदा अठरा हजार च्या खाली घसरला व 17914 वर बंद झाला हे घसरण सुमारे एक टक्का होती. तर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सुद्धा 631 अंकांनी घसरून परत एकदा 61 हजाराच्या खाली म्हणजे 60115 वर बंद झाला. तिसरा प्रमुख निर्देशांक बँक निफ्टी एकेकाळी खूप उच्च पदावर ती होता तो आज 568 अंकांनी घसरून 42014 वर बंद झाला एकच बाब चांगली आहे की हा 42000 वरती सध्या तरी ट्रेड करत आहे.
ॲडव्हान्स डिक्लाइन रेशो सुद्धा आज मंदीची वाटचाल दाखवत होते आज 685 शेअर्स वधारले तर 1345 शेअर्स घसरले.
अडाणी इंटरप्राईजेस, आयशर मोटर, एसबीआय हे निफ्टी मधील प्रमुख घसरलेले शेअर्स आहेत. तर टाटा मोटर्स, हिंदाल्को, अपोलो हॉस्पिटल, पावर ग्रिड हे निफ्टी मधील वाढलेले शेअर्स आहेत.
बँकिंग शेअर्स विचार केला तर आज एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक हे शेअर सुद्धा आज घसरले.
जे एल आर यांचा परदेशातील विक्री वाढल्यामुळे तसेच सी एल एस ए या रिसर्च संस्थेने टाटा मोटर्सला खरेदी करावे असा अहवाल दिल्यामुळे आज टाटा मोटर्स जवळपास सहा टक्के वरती होता. तसेच टाटा मोटर्स मधील कमर्शियल व्हेईकल तसेच पॅसेंजर वेहिकल यामध्ये त्यांचे मार्जिन वाढल्यामुळे म्हणजेच त्यांचे नफ्याचे प्रमाण वाढल्यामुळे सुद्धा हा शेअर आज सहा टक्के वाढलेला होता.
परदेशी रिसर्च संस्थेने टाटा मोटर साठी 512 रुपये एवढे टारगेट दिल्यामुळे सुद्धा हा शेअर आत्ता वधारलेला आहे. जग्वार लँड रोव्हर जी टाटा मोटर्सची पूर्णतः सबसिडरी आहे त्यांनी नऊ जानेवारीला जो अहवाल दिला त्यामध्ये त्यांनी तिसऱ्या तिमाही करता म्हणजेच ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आर्थिक वर्ष 2023 करिता त्यांचे वाहनाचे विक्रीचे आकडे सुधारलेले आहेत तसेच त्यांना सेमीकंडक्टर चिप्सचा पुरवठा योग्य होतो आहे असा अहवाल दिल्यामुळे टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये आज बरीच सुधारणा झालेली बघितली. टाटा मोटर आज सुमारे सहा टक्के म्हणजे 24 रुपयाने वधारून 413 यावर पोहोचला होता व त्या अगोदर तो दिवसभरामध्ये 415 या उच्च पातळीवर ती सुद्धा गेलेला होता. परदेशी रिसर्च संस्था यांनी जे त्यांचे टार्गेट दिलेले आहे त्यामुळे सुद्धा हा शेअर आज वधारलेला होता. गुंतवणूकदारांनी सुद्धा कंपनीचे अहवाल विक्रीचे आकडे व व्यवसाय अशा तत्सम बाबी बघून व स्वतःचा अभ्यास करून मगच यात गुंतवणूक करावी. अभ्यास न करता गुंतवणूक केलेली ही कदाचित धोक्याची असू शकते तसेच गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीला व होणाऱ्या नफ्या तोट्याला स्वतः गुंतवणूकदार जबाबदार असतात हे सर्व गुंतवणूकदारांना माहिती आहेतच.
दुसरीकडे मेटल स्टॉक मध्ये सुद्धा आज चांगले वाढ बघायला मिळाली. शेअर्स मध्ये सुद्धा आज घसरण बघायला मिळाली. टीसीएस या कंपनीचे शेअर सुद्धा आज घसरले.
परदेशातून काही महत्त्वाचे घटनाक्रम पुढील दिवसांमध्ये आहेत तसेच 12 तारखेपासून आयटी कंपन्यांचे तसेच इतर कंपन्यांचे सुद्धा निकाल येणार आहेत त्यामुळे सुद्धा आज बाजारामध्ये संमिश्र वातावरण होते तसेच गुंतवणूकदारांनी आज जास्त करून नफा घेण्याचे पसंत केले.
भारत पे या कंपनीला ऑनलाइन पेमेंट ॲग्रीगेटर यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने यांना तत्वतः मंजुरी दिलेली आहे. पेमेंट ॲग्रीगेटर म्हणजे ही कंपनी ई-पेमेंट सुविधा व्यापारी व कॉमर्स साईट यांना देणार ते ग्राहकांकडून पैसे गोळा करून वा पैसे जमा करून ते पैसे व्यापाऱ्यांना थोड्या कालावधीनंतर देणार.
जर निफ्टी चा विचार केला तर निफ्टी आत्ता 18000 च्या सुद्धा खाली ट्रेड करत आहे व अशा वेळेला निफ्टीला 17800 या पातळीवरती सपोर्ट आहे परंतु जर ती पातळी सुद्धा तोडली गेली तर मात्र मग निफ्टी 17600 पर्यंत येऊ शकतो. सतत निफ्टी 17900-18000 अशा पातळीमध्ये असल्यामुळे निफ्टीला यापुढे 18000 ची पातळी ओलांडून सतत पुढे जाणे थोडेसे अवघड वाटत आहे.
माझ्या अंदाजाप्रमाणे यापुढे निफ्टी सतत 17700-18100 या पातळीमध्ये ट्रेड करेल व काहीतरी चांगली बातमी आल्यानंतरच निफ्टी 18200 ची पातळी तोडून पुढे जाईल असे वाटत आहे.
दुसरीकडे बँक निफ्टी या निर्देशांकाला 43000 याठिकाणी खूप मोठा विरोध आहे व त्यामुळे 43000 ही पातळी गाठायला त्याला वेळ लागू शकतो परंतु जर बँक निफ्टी ने 42000 ही पातळी तोडली तर मात्र अजून विक्रीचा दबाव येऊन तो दोनशे-तीनशे अंकाने खाली घसरू शकतो, असा माझा अंदाज आहे.
आपणास हा आढावा कसा वाटला ते नक्की कळवा तसेच या मध्ये अजून काही बदल तसेच अजून काही गोष्टी तुम्हाला हवे असतील तर त्या सुद्धा कळवा.
प्रसाद जोशी