सन 2023 वर्षातील आजचा हा पहिला डेरिव्हेटिव्ह चा एक्सपायरीचा दिवस होता परंतु आज या दिवशी गुंतवणूकदारांची शेअर बाजाराने निराशा केली व बाजाराने म्हणजेच निफ्टीने खूप आटोकाट प्रयत्न केला परंतु 18000 च्या वर बंद होऊ शकला नाही. म्हणजेच थोडक्यामध्ये आज सुद्धा बाजारावर मंदीवाल्यांची पकड घट्ट आहे असे वाटत होते.
खरे पाहता निफ्टी आज दिवसाची सुरुवात होताना चांगल्या दिशेने सुरुवात करून उघडला व 18120 ची पातळी गाठली. परंतु मंदीवाल्यांचे पकड घट्ट असल्यामुळे ही पातळी निफ्टीला टिकवता आली नाही. व त्या ठिकाणाहून तो खाली घसरत 17892 पर्यन्त आला. त्यानंतर परत शेवटच्या अर्धा तासांमध्ये थोडी तेजी दिसून आली निफ्टी परत एकदा 18000 च्या वर जातो की काय असे वाटत होते एका क्षणाला त्याने 18000 ही पातळी सुद्धा गाठलेली होती परंतु परत एकदा मंदीवाल्यांनी आजच्या दिवसाला विकली एक्सपायरी असल्यामुळे धडाकाच लावला व शेवटी निफ्टी ला त्यांनी 18000 च्या खाली आणून मग क्लोज केला. व शेवटी निफ्टी 18000 च्या खाली म्हणजे 17992.15 वर बंद झाला.
अशाप्रकारे 18 हजाराची एक मानसिक पातळी निफ्टीने आता तोडलेली आहे यापुढे 17800 हा निफ्टीला एक चांगला सपोर्ट आहे.
आजच्या स्टॉक मध्ये मोठी उलाढाल दिसली तसेच आज चांगली वाढ दर्शवली ते खालील प्रमाणे.
इंजिनीयर इंडिया आज 7.5% वाढून 84.80 वर बंद झाला, अपोलो टायर्स,दि फर्टीलायझर अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेड, जे बी एम ऑटो, अडाणी टोटल गॅस लिमिटेड.
ज्या शेअर्समध्ये खूप मोठी घसरण झाली ते खालील प्रमाणे
बजाज फायनान्स लिमिटेड, आजच्या दिवसांमध्ये बजाज फायनान्स या शेअरमध्ये दिसून आली व हा शेअर आज सुमारे 7 टक्के घसरला. बजाज फिन्सर्व लिमिटेड, चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट, आय आर बी इन्फ्रास्ट्रक्चर
आय आर बी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला यांच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर ने स्टॉक स्प्लिट करण्यासाठी मंजुरी दिली आहे. हा स्टॉक अगोदर दहा रुपये फेस व्हॅल्यू चा होता यापुढे एक रुपया फेस व्हॅल्यू चा असेल. कंपनीने अजून याबाबत रेकॉर्ड जाहीर केलेली नाही.
बजाज फायनान्स या शेअरमध्ये आज खूप मोठी घसरण बघायला मिळाले कारण बजाज फायनान्स ज्या ॲसेट मॅनेजमेंट आहेत त्यामध्ये फारशी वाढ झाली नाही व ही फारशी वाढ म्हणजे भविष्यकाळात या कंपनीची कामगिरी चांगली नसेल असे बाजाराला वाटल्यामुळे काही ब्रोकरेज हाऊसने बजाज फायनान्स विक्री करावी असा अहवाल दिला. याबरोबरच अजून एक मोठी कंपनी म्हणजेच अजून एक मोठी इंडस्ट्री बँकिंग सेक्टर मध्ये येणार आहे अशी खबरबात आहे त्यामुळे बजाज फायनान्स या कंपनीला ही फार मोठी स्पर्धा असेल व जर ही मोठी इंडस्ट्री या क्षेत्रात उतरली तर त्यामुळे या क्षेत्रामध्ये खूप मोठे बदल होण्याची संभावना आहे त्यामुळे सुद्धा पेनिक बटन दाबून गुंतवणूकदारांनी बजाज फायनान्स मध्ये विक्रीचा धडाका लावला.
सेन्सेक्स सुद्धा आज लाल रंगा मध्येच बंद झाला सेन्सेक्समध्ये आज सुमारे 300 अंकांची घसरण होऊन सेन्सेक्स 60353 बंद झाला.
निफ्टी बँक या निर्देशांकामध्ये सुद्धा खूप मोठी घसरण झाली व तो आज साडेतीनशे अंकांच्या घसरणीने 42608 बंद झाला. तसे पाहता निफ्टी बँक मध्ये दिवसभरामध्ये खूप मोठी उलाढाल झाली व तो एका क्षणाला खूप खाली कोसळला होता. परंतु शेवटच्या अर्ध्या तासामध्ये तेजी वाल्यांनी जरा धडक मारल्यामुळे थोडासा तो सावरला परंतु मंदी वाल्यांची पकड तेजीवाले कमी करू शकले नाहीत व त्यामुळे निफ्टी बँक यालासुद्धा लाल रंगामध्ये बंद व्हावे लागले.
अपोलो टायर या शेअर मध्ये आज फ्युचर अंड ऑप्शन सेगमेंटमध्ये ओपन इंटरेस्ट मध्ये खूप वाढ झाली व त्यामुळे हा शहरात तेजी मध्ये होता.
मार्केटला अजूनही आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये महागाई रोखणे तसेच व्याजदर मध्ये चढ-उतार हे जे दोन मुद्दे आहेत यामुळे बाजारामध्ये सतत दोलायमान परिस्थिती दिसून आलेली आहे.
एफएमसीजी या सेक्टर मध्ये सन 2023 मध्ये तेजी येण्याची शक्यता आहे असे काही जणांना वाटत आहे त्यामुळे आज एफएमसीजी सेक्टरमधील काही कंपन्यांचे चे भाव वाढलेत.
![सन 2023 मधील पहिला डेरिव्हेटिव्ह एक्सपायरी दिवस लाल रंगांमध्ये बंद. 05 जानेवारी, शेअर बाजार आढावा, प्रसाद जोशी द्वारा. 2 share market post](https://i0.wp.com/nashikfast.com/wp-content/uploads/2022/11/share-market-post-.jpeg?resize=640%2C905&ssl=1)
न्यू दिल्ली टेलिव्हिजन या कंपनीचे अजून दोन टक्के शेअर्स त्यांचे गुंतवणूकदार एल टी एस इन्व्हेस्टमेंट फंड यांनी आज ओपन मार्केट द्वारे विकले त्यामुळे एल टी एस यांचा या कंपनी मधील हिस्सा आता 2.69 टक्के एवढाच राहिला आहे.
सोमानी सिरामिक्स या कंपनीमध्ये एका म्युच्युअल फंड मे सुमारे तीन लाख शेअर्स ओपन मार्केट द्वारे विकत घेतलेले आहेत या विकत घेतलेल्या शेअरची किंमत रुपये 499 प्रतिशेअर अशी आहे.
कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स ने 300 कोटी रुपये एन सी डी द्वारे द्वारे उभे केलेले आहेत.