निफ्टी निर्देशांक, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स तसेच इतर सर्व निर्देशांकामध्ये जे काही मागील आठवड्यामध्ये भरपूर वाढ झाली होती त्यानंतर गुंतवणूकदारांनी नफा घेण्याचे धोरण वापरल्याने तसेच अमेरिकेमध्ये मंदि येणार असे वातावरण तसेच महागाई आटोक्यात येत नाही व एका बाजूला व्याजदर वाढतच आहेत अशा कोंडीमध्ये बाजार सापडलेला होता. त्यामुळे मागील आठवड्यामध्ये बाजारामध्ये सर्वत्र नकारात्मक वातावरण होते.
परंतु बऱ्याच स्टॉकचे दर खरेदी योग्य आहेत असे वाटल्यामुळे व निफ्टी निर्देशांक हा 18300 या पातळीला पोहोचल्यामुळे बाजारामध्ये आज सकारात्मक वातावरण निर्माण झाले होते. आठवड्याचा पहिला दिवस बाजाराने चांगला दिला व निफ्टी निर्देशांकाने परत एकदा 18400 ही पातळी गाठली.व आज बहुसंख्य निर्देशांक हे हिरव्या रंगात बंद झाले. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये SGX NIFTY सुद्धा आज फ्लॅट होता.
निफ्टी फिफ्टी आज 151.45 अंकांनी वाढून 18420.45 वर बंद झाला. निफ्टी फिफ्टी मध्ये आज
ADANI PORTS हा शेअर सर्वाधिक म्हणजे 3.77% वाढून 892.85 वर बंद झाला.
निफ्टी मधील इतर जे शेअर वाढले ते पुढीलप्रमाणे :-
M&M, EICHER, POWER GRID, ADANI ENT, BAJAJ AUTO, BHARTI AIRTEL, HERO MOTOCORP, BRITANNIA, HINDUSTAN UNILEVER
निफ्टी मध्ये खालील शेअरमध्ये आज घसरण झाली.
TCS, INFOSYS, TATA MOTORS, INDUSIND BANK, WIPRO
सेन्सेक्स आज 468 अंकांनी वाढून 61806 वर बंद झाला. सेन्सेक्समध्ये भरीव वाढ करणारे शेअर पुढील प्रमाणे:-
M&M, POWER GRID, BHARTI AIRTEL, BAJAJ FINSERV, HINDUSTAN UNILEVER, HDFC, MARUTI, ITC, TITAN, NESTLE, RELIANCE, ASIAN PAINTS
सेन्सेक्स मध्ये खालील शेअरमध्ये घसरण झाली.
TCS, TATA MOTORS, INFOSYS, SUN PHARMA, WIPRO, INDUSIND BANK,
NIFTY MIDCAP100 हा निर्देशांक सुद्धा आज 176 अंकांनी वाढून 32186.75 वर बंद झाला.
NIFTY NEXT 50 हा निर्देशांक 427 अंकांनी वाढून 43413 वर बंद झाला. यात प्रामुख्याने LIC, INTERGLOBE, DMART, HDFC AMC, HAL, MARICO, VEDANTA, SIEMENS, AMBUJA CEMENT यात भरीव वाढ झाली. तर NYKAA, PROCTOR AND GAMBLE, BIOCON यात घसरण झाली.
आज परत मात्र निफ्टी आयटी या निर्देशांकामध्ये घसरण बघायला मिळाली. अमेरिकेमध्ये मंदीचे वातावरण निर्माण झाल्यामुळे व अजूनही व्याजदर वाढवणार आहेत अशी बातमी आल्यामुळे निफ्टी आयटी निर्देशांक सतत लाल रंगा मध्येच बंद होत आहे.
शेअर बाजारातील इतर बातम्या पुढील प्रमाणे :-
सेबीने बाय बॅक संदर्भामध्ये एका कमिटी द्वारे अहवाल मागितला होता त्यानुसार यामध्ये बायबॅक मध्ये भरीव बदल सेबी करू शकते. कंपन्या ज्याप्रमाणे ओपन मार्केट द्वारे बाय बॅक करतात त्यामुळे वैयक्तिक गुंतवणूकदारांना कोणताही फायदा होत नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ओपन मार्केट बायबॅक कदाचित सेबी करू शकते.
SURYODAY SMALL FINANCE या कंपनीच्या प्रमोटर यांनी कंपनीचे अंदाजे 55.45 कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली.
GMM PFAUDLER या कंपनीच्या प्रमोटरने 1154 कोटी रुपयाच्या शेअर्सची विक्री केली.
SUN PHARMA कंपनीला त्यांच्या एका कारखान्याविषयी USFDA कडून नकारात्मक पत्र मिळाल्यामुळे या शेअरमध्ये आज घसरण झाली.
टाटा ग्रुप आता यूटीआय ॲसेट मॅनेजमेंट या कंपनीमध्ये मेजॉरिटी हिस्सा विकत घेणार आहे या बातमीमुळे आज यूटीआय ॲसेट मॅनेजमेंट हा शेअर मात्र खूप वधारला.
येस बँकेने त्यांच्या नोन परफॉर्मिंग एसेट (NPA) पैकी जवळपास 48,000 कोटी रुपयांच्या NPA या JC FOLLOWERS परदेशी कंपन्या देण्याचे ठरवल्यामुळे दिवसभरातल्या काही काळ हा शेअर वधारला होता परंतु नंतर विक्रीमुळे हा घसरला.
या महिन्यांमध्ये आयपीओ द्वारे दोन हजार कोटी रुपयांची भांडवल निर्मिती होणार आहे.
SULA VINEYARDS या कंपनीचा आयपीओ मागील आठवड्यात आला होता त्याची आज अलॉटमेंट सुरू होणार आहे. येणाऱ्या दोन-तीन दिवसात हा आयपीओ बाजारात नोंद होईल.
आज पासून KFIN TECH LTD या आयपीओ ला सुरुवात झालेली आहे हा आयपीओ बुधवारी बंद होईल. याचा किंमत पट्टा 347-366 एवढा आहे. 1500 कोटी रुपयांचा असलेला हा आयपीओ पूर्णपणे ऑफर फोर सेल आयपीओ आहे.
गुंतवणूकदारांनी नेहमी मार्केटचा अभ्यास करून तसेच खरेदीकरणा योग्य असलेल्या शेअरचा अभ्यास करून त्याचे योग्य आकलन करून व आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेऊन गुंतवणूक करणे अपेक्षित आहे.
प्रसाद जोशी 94 22 50 2043