शेअर बाजाराचा आढावा तारीख 07 डिसेंबर 2022, प्रसाद जोशी अखेरीस आज 07 डिसेंबर तारीख उजाडली. व सर्व गुंतवणूकदार विश्लेषक हे रिझर्व बँकेच्या निर्णयाच्या वेळेची वाट पाहत होते. दहा वाजतील व रिझर्व बँक केव्हा एकदा घोषणा करेल व त्यानंतर मध्ये काय परिस्थिती येईल सर्वजण वाट पाहत होते, जसे काही सर्वांनी देवच पाण्यात ठेवून या क्षणाची वाट पाहत होते.अखेरीस दहा वाजले व रिझर्व बँक गव्हर्नर श्रीयुत शक्तिकांता दास यांनी त्यांचे भाषणास सुरुवात केली. खरेतर मार्केटला 00.35% एवढा रेपो रेट वाढणार आहे याची अपेक्षा होती परंतु ही घोषणा रिझर्व बँकेने करण्याची वाट पाहत होते. व मार्केटच्या अपेक्षेप्रमाणे रिझर्व बँकेने आज रेपो रेट हा 00.35 टक्के ने वाढवून तो 6.25% वर नेला. त्यानंतर काही काळ मार्केटमध्ये थोडी तेजी निर्माण होण्यासारखी परिस्थिती होती, मी काय शब्द वापरत आहे, मार्केटमध्ये तेजी निर्माण होण्यासारखी परिस्थिती होती. परंतु ही परिस्थिती फार काळ टिकली नाही व ज्या प्रमाणे फुग्यातून हवा एकदम निघते त्याप्रमाणे मार्केटने फुग्यातील तेजी क्षणार्धात घालवून टाकली. व मार्केट परत एकदा लाल रंगाकडे आकर्षित झाले. मार्केटला अपेक्षित होता त्या रेट एवढाच रिझर्व बँकेने रेपो रेट वाढलेला आहे तरीसुद्धा मार्केट बरेच दोलायमान होते व शेवटी सर्व प्रमुख निर्देशांक लाल रंगात बंद झाले म्हणजे त्यांच्यामध्ये घसरण बघायला मिळाली.जरी रिझर्व बँकेने रेपो रेट 00.35 टक्के वाढला असला तरी याबरोबरच रिझर्व बँकेने खालील घोषणा सुद्धा केल्यात1. अजून महागाई पूर्ण आटोक्यात आलेले नाही, त्यामुळे फेब्रुवारी 2023 मध्ये सुद्धा परत एकदा बँक रेपो रेट वाढवू शकते.2. भारताची एकूण जीडीपी ही अपेक्षेएवढी नाही व रिझर्व्ह बँकेने जीडीपी वाढीचे आकडे कमी केलेत .रिझर्व बँकेने रेपो रेट वाढवल्यामुळे आत्ता कर्ज वरील व्याजदर वाढणार आहेत तर याबरोबरच फिक्स डिपॉझिट वरील सुद्धा व्याजदर वाढतील. यामुळे ज्यांनी ज्यांनी कर्ज घेतलेले आहेत त्यांचे कर्ज अजून महाग होतील तसेच त्यांचे EMI सुद्धा याबरोबर वाढतील. यामुळे बाजारांमधील क्रयशक्ती कमी होईल व बाजारांमध्ये येणारा पैसा कमी होईल. रिझर्व बँकेने रेपो रेट वाढवल्यामुळे इतर बँकासुद्धा हळूहळू व्याजदर वाढतील व ज्यांना आता कर्ज घ्यायचे आहे तसेच ज्यांना आत्ता घर खरेदी करणे आहे त्यांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. व हे आत्ताच नाही तर येणाऱ्या 2023 फेब्रुवारी मध्ये सुद्धा व्याजदर वाढणार आहेत घर खरेदी केलेल्या विद्यमान ग्राहकांवर व नवीन घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांवर सुद्धा याचा बोजा पडणार आहे.व ही बाब मार्केटला अजिबात आवडले नाही. व त्यामुळे आज मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 215.68 अंकांनी घसरून 62410.68 वर बंद झाला. तर निफ्टी फिफ्टी हा निर्देशांक 82.25 अंकांनी घसरून 18560.50 वर बंद झाला. व निफ्टी आत्ता 18600 या पातळीच्या खाली येऊन थांबलेला आहे.तसेच निफ्टी बँक सुद्धा 39.85 अंकांनी घसरून 43098.70 यावर बंद झाला.
![शेअर बाजार आढावा; 07 डिसेंबर , लेखक प्रसाद जोशी 2 share market post](https://i0.wp.com/nashikfast.com/wp-content/uploads/2022/11/share-market-post-.jpeg?resize=640%2C905&ssl=1)
परंतु निफ्टी नेक्सट फिफ्टी या निर्देशांकामध्ये 86.00 अंकांची वाढ होऊन 43892.20 वर बंद झाला. याबरोबरच सेक्टर निर्देशांकामध्ये NIFTY FMCG हा निर्देशांक आज 436.75 अंकांनी वाढून 45724.60 वर बंद झाला.आज ऍडव्हान्स डिक्लाइन मध्ये मात्र जास्त शेअर घसरले तर कमी शेअर वधारले.आज ज्या शेअरमध्ये तेजी दिसून आली ते पुढीलप्रमाणे ASIAN PAINTS, HUL, BPCL, LARSEN, AXIS BANK, ITC, M&M, HDFC AMC, ICICI LOMBARD, COLGATE.तर ज्या शेअरमध्ये आज घसरण झाली ते पुढील प्रमाणेNTPC, SBI LIFE INSURANCE, BAJAJ FINSERV, INDUSIND BANK, TATA MOTORS, BAJAJ AUTO, RELIANCE, OBEROI REALITY, DELTA CORP, JUBILANT FOOD, LTIMINDTREE, PIRAMAAL ENTERबाजारातील पुढील मुख्य घटना म्हणजे गुजरात निवडणुकीचे निकाल त्यावर सर्व विश्लेषकांचे लक्ष लागून आहे. व तो मार्केट साठी एक ट्रिगर पॉईंट असणार आहे. बघूया पुढील आठवड्यात मार्केटवर याचे काय पडसाद उमटतात.शेअर बाजारातील ताज्या घडामोडी, आयपीओ बाजारात विषयी माहिती तसेच यामधील इतर माहिती व घडामोडी साठीमराठी या वेबसाईटला नक्की भेट देत रहा.अर्थसाक्षर व शेअर बाजार साक्षर होऊन शेअर बाजारातील फायदा घेऊन आपली आर्थिक प्रगती करण्याचा प्रयत्न करा.