काल जागतिक बाजारांमध्ये तेजी बघायला मिळाली त्याची मुळे भारतीय बाजारांमध्ये सुद्धा तेजी येणार आहे विश्लेषकांचा अंदाज व त्यामुळे आज सुद्धा परत बाजारामधील बहुसंख्य इंडेक्स हे नवनवीन उच्चांक स्थापन करत आहेत.मुंबई स्टॉक एक्सचेंज चा सेन्सेक्स आज 63357 वर उघडून 63583 ही उच्चांकी पातळी गाठून शेवटी 632849 वर बंद झाला.
सेन्सेक्स मधील खालील शेअरने भरीव कामगिरी दाखवली त्यातULTRATECH CEMENT 2.86% वाढ, TATA STEEL 2.79% वाढ , TCS 2.44% वाढ, TECH MAHINDRA 2.27% . अशाप्रकारे आज आयटी स्टॉक मध्ये भरीव वाढ बघायला मिळाली.
सेन्सेक्स मधील जे शेअर्स च्या भावात आज थोडीफार घसरण बघायला मिळाली ते खालील प्रमाणेICICI BANK 1.41% घसरण, M & M 1.06%,, POWER GRID CORP, HUL दुसरीकडे निफ्टी फिफ्टी मध्ये 18800 ही पातळी सुद्धा ओलांडली व 18887.60 ही उच्चांकी पातळी दाखवून 18812.50 वर बंद झाला. जागतिक बाजारांमध्ये सकारात्मक वातावरण दिसल्यामुळे त्याचा परिणाम आज निफ्टी वर होणार हे विश्लेषकांना अगोदरच समजलेले होते. विश्लेषक आजचा निफ्टी 19000 ही पातळी केव्हा ओलांडणार याची वाट पाहत आहे. कदाचित डिसेंबर 2022 च्या एक्सपायरी च्या वेळेला 19000 ही पातळी निफ्टी पार करेल असे विश्लेषकांचे मत आहे
![१ डिसेंबर : शेअर बाजार आढावा : प्रसाद जोशी 2 share market post](https://i0.wp.com/nashikfast.com/wp-content/uploads/2022/11/share-market-post-.jpeg?resize=640%2C905&ssl=1)
निफ्टी मध्ये ज्या कंपन्यांनी आज भरीव कामगिरी आज केले आहे ते शेअर्स खालील प्रमाणे ;-TATA STEEL, HINDALCO, ULTRATECH CEMENT, TCS, GRASIM, TECH MAHINDRA, WIPRO, HCL TECH. निफ्टी मध्ये आज निराशाजनक कामगिरी दाखवली त्या कंपन्या होत्या UPL, EICHER MOTORS, ICICI BANK, CIPLA, BAJAJ AUTO.वाहन विक्री चे जे काही नंबर्स जाहीर झाले आहेत बजाज ऑटोची जे काही नंबर आहेत त्यामुळे गुंतवणूकदारांची थोडी निराशा झालेली आहे.
बजाज ऑटो चे एक्सपोर्ट वरती परिणाम झालेला असल्यामुळे त्यांचे नंबर्स थोडे निराशाजनक आहेत त्यामुळे सुद्धा बजाज ऑटोच्या शेअर वरती याचा परिणाम झाला.निफ्टी बँक यामध्ये फारशी उलाढाल दिसले नाही व हा निर्देशांक फक्त 29.65 अंकाने वाढून 43260 वर बंद झाला. यामध्ये ज्यांनी भरीव कामगिरी केली ते PNB, BANK OF BARODA, FEDERAL BANK, SBI , HDFC BANK ज्या शेअरमध्ये आज घसरण बघायला मिळाली ते निफ्टी बँक मधील शेअर पुढील प्रमाणेICICI BANK, BANDHAN BANK, KOTAK MAHINDRA.
आज निफ्टी मिडकॅप मध्ये तेजी दिसून आली व हा निर्देशांक 246 अंकांनी वाढून 32283 वर बंद झाला. दुसरा महत्त्वाचा निर्देशांक निफ्टी नेक्स्ट फिफ्टी मात्र आज फक्त 169 अंकाने वाढून 43857 वर बंद झालावाहन विक्री बाबतीत जे काही आकडे झालेत गुंतवणूकदारांची थोडी फार निराशा झाली त्यामुळे आज तर इंडेक्समध्ये निफ्टी ऑटो या निर्देशांकामध्ये आज घसरण बघायला मिळाले. त्याचबरोबर NIFTY PHARMA, NIFTY FMCG या निर्देशांकामध्ये आज घसरण झाली.आज ऍडव्हान्स डिक्लाइन रेशो.
आज 1212 शेअर वधारले तर 786 शेअर्समध्ये घसरण दिसून आली.UNIPARTS INDIA LIMITED या कंपनीचा आयपीओ आजपासून सुरू झाला व हा 02 डिसेंबर 2022 पर्यंत खुला राहणार असून याचा किंमत पट्टा रुपये 577 असून 25 शेअर चा एक लॉट आहे. हा आय पी ओ हा लेख लिहीपर्यंत एकूण 2.02 पट भरला गेलेला आहे. रिटेल कॅटेगरीमध्ये 2.00 पट भरला गेलेला आहे.शेअर बाजारातील ताज्या घडामोडी, आयपीओ बाजारात विषयी माहिती तसेच यामधील इतर माहिती व घडामोडी साठीमराठी या वेबसाईटला नक्की भेट देत रहा. अर्थसाक्षर व शेअर बाजार साक्षर होऊन शेअर बाजारातील फायदा घेऊन आपली आर्थिक प्रगती करण्याचा प्रयत्न करा.