नागपूर कारागृहात पैसे घेऊन गांजा पुरविण्याचा रॅकेटचा नागपूर शहर पोलिसांनी केला भांडाफोड केला असून या प्रकरणी कारागृहातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह 5 कैद्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे । अजिंक्य राठोड आणि प्रशांत राठोड अशी कारागृहातील पोलीस कर्मचाऱ्यांची नावे असून हे दोघे कारागृहातीलच 5 कैद्यांचा मदतीने इतर कैद्यांसाठी गांजा, विविध खाद्यपदार्थ, कपडे, पैसे बेकायदेशीरपणे कारागृहात आणत होते.
याची गुप्त माहिती पोलीस यांना मिळताच या प्रकरणाची चौकशी करून या प्रकरणाचा भांडाफोड करण्यात आला । धंतोली पोलिसांनी या प्रकरणात सहभागी असणाऱ्यांवर गुन्हेगार कट, फसवणूक, बनावट कागदपत्रे बनविणे अश्या गुन्ह्याची नोंद करून आरोपींना अटक केली आहे.