आज दिनांक १६ नोव्हेंबर २०२२, बुधवार रोजी परत एकदा मार्केट तेजीमध्ये बंद झालेले आहे.
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स हा आज १०७.७३ पॉईंट ने वाढ होऊन तो ६१९८०.७२ ला बंद झाला तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज इंडेक्स निफ्टी फिफ्टी फक्त ६.२५ पॉईंट वाढून १८४०९.६५ झालेला आहे. तसेच अजून एक लोकप्रिय इंडेक्स निफ्टी बँक हा सुद्धा १६२.६० वाढून ४२५३५.३० वर बंद झाला.
आज सेन्सेक्स व निफ्टी यांनी नवीन उच्चांक तयार केला, पण निफ्टी मधील इतर इंडेक्स मध्ये आज नफा घेण्यात आला त्यामुळे आज इतर निफ्टी इंडेक्स बरेचसे लाल रंगात बंद झाले आहेत.
पण, एकूणच भारताची विकास गाथा सुरू असून स्टॉक एक्सचेंज मध्ये आता सेन्सेक्स 60,000 वरती निफ्टी फिफ्टी हा इंडेक्स 18000 त्याच्यावरती जाऊन त्याची पुढील घोडदौड सुरू झालेली आहे.
शेअर बाजारात दुपारी दोन वाजेनंतर अचानक विक्री सुरु झाली त्यामुळे जरी प्रमुख इंडेक्स मध्ये तेजी दिसली तरी नॅशनल स्टॉक एक्स्चेंज वरील एकूण फक्त ७५१ शेअर आज वधारले तर त्या प्रमाणात १२४५ शेअर मध्ये घट दिसून आली. ऍडव्हान्स डिक्लाइन रेशो त्यामुळे ७:१२ असा झाला आहे.
![शेअर मार्केट कॉमेंट्री, बुधवार १६ नोव्हेंबर : प्रसाद जोशी 2 share market pune adv](https://i0.wp.com/nashikfast.com/wp-content/uploads/2022/11/share-market-pune-adv.jpeg?resize=576%2C1024&ssl=1)
वैयक्तिक शेअर बाबतीत :-
HINDUSTAN AERONATICS यात ६.२८% म्हणजे १५८.३५ रुपयेची वाढ दिसून आली.
KOTAK MAHINDRA BANK मध्ये रुपये ५३.५०ची म्हणजे २.८०% ची वाढ नोंदली गेली.
COAL INDIA मध्ये आज तेजी निर्माण झाली होती, आज १.१८% म्हणजे रुपये २.७५ ने वाढ झाली.
सरकारी शेअर HUDCO यात आज अभूतपूर्व तेजी निर्माण झाली होती, आज हा शेअर जवळपास १४ टक्के वाढला होता. याचा कालचा बंद भाव रुपये ४१.६० होता तर उच्चतम भाव ४८.८० होता तर हा ४७.२५ वर बंद झाला आहे.
जे शेअर आज काही प्रमाणात कोसळले ते असे :-
APOLLO TYRES आज ६.८४% म्हणजे रुपये २०.३५ ने कमी होऊन २७७.३५ वर बंद झाला.
METROPOLIS या कंपनीच्या बाबतीत आयकर विभाग काही शोध घेत आहेत अशी बातमी मीडियामध्ये आली त्यामुळे हा शेअर ७.७५टक्के कमी होऊन १४३५.९० वर बंद झाला.
L & T INFOTECH व MINDTREE यांच्या मर्जरला नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल यांनी मान्यता दिली आहे.
IPO MARKET :-
आज दोन कंपनीचे लिस्टिंग होते.
GLOBAL HEALTH LIMITED – IPO किंमत होती रुपये ३३६/-, ज्याची ४०१ रुपयेवर बाजारात नोंदणी झाली तर तो ४२३ रुपयावर बंद झाला.
BIKAJI FOODS INTERNATIOAL – IPO किंमत होती रुपये ३००/- ज्याची नोंद बाजारात ३२२ वर होऊन हा ३१७ या भावावर बंद झाला.
सेन्सेक्स व निफ्टी इंडेक्स मध्ये तेजी सुरुच आहे. आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेऊन यात गुंतवणूक करून स्वतःच्या व देशाच्या आर्थिक प्रगतीला हातभार लावा.
प्रसाद जोशी, पुणे