. *–II ● विवेक विचार ● II–* प्रत्येक कर्माच्या फलामध्ये चांगले आणि वाईट या दोघांचे मिश्रण असते. कोणत्याही सत्कर्मात वाईटाचा थोडा ना थोडा अंश असतोच. जिथे अग्नी तिथे जसा धूर, तसेच कर्माला सर्वदा काही ना काही वाईट चिकटलेले असतेच. ज्यामध्ये चांगल्याचा जास्तीत जास्त आणि वाईटाचा अगदी कमीत कमी अंश असेल अशीच कर्मे आपण नेहमी करावीत. तीच सत्कर्मे होय. *स्वामी विवेकानंद…..**● आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो ●**★ भारतीय सौर १० कार्तिक शक १९४४*★ कार्तिक शुध्द /शुक्ल ८★ शालिवाहन शके १९४४★ युधिष्ठिर शक युगाब्द ५१२४ ★ मंगळवार दि. १ नोव्हेंबर २०२२★ १८७३ बंगाली नाटककार दीनबंधू मित्र यांचा स्मृतीदिन★ १९२१ आपल्या सदासतेज अभिनयाने मराठी रसिकांच्या मनावर प्रदीर्घकाळ प्रसन्नतेचे अधिराज्य गाजवणारे विनोदी कलाकार शरद गणेश तळवलकर यांचा जन्मदिन ★ १९४५ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा जन्मदिन. ★ १९५६ भाषावार प्रांत रचना दिन.★ १९५६ भारताचे दक्षिण टोक कन्याकुमारी केरळ राज्यातून तामिळनाडू राज्याला हस्तांतरित करण्यात आले.★ १९९४ शेती आणि पाणी विषयाचे तज्ञ, कामगार नेते कॉम्रेड दत्ता देशमुख यांचा स्मृतिदिन★ जागतिक शाकाहारी दिन.
*संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक*