हृदय शुद्ध असले पाहिजे आणि शुद्ध हृदयाला केवळ शुभच दिसते. त्याला अशुभ दिसत नाही. मानवजातीचे रक्षक होण्याचा आपण कधी आव आणू नये. आपलेच मन शुद्ध ठेवण्याचा आपण सतत प्रयत्न करावा. याचा परिणाम असा होईल की आपल्याकडून इतरांचेही कधीच अहित होणार नाही तर नेहमी हितच होईल.
*स्वामी विवेकानंद…..*
● आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो ●**★ भारतीय सौर ४ कार्तिक शक १९४४*★ कार्तिक शुध्द /शुक्ल १★ शालिवाहन शके १९४४★ युधिष्ठिर शक युगाब्द ५१२४ ★ बुधवार दि. २६ ऑक्टोबर २०२२★ बलिप्रतिपदा दीपावली ‘पाडवा’ ★ भाऊबीज ★ यम द्वितीया, अभ्यंगस्नान★ १८९० भारतीय पत्रकार आणि राजकारणी गणेश शंकर विद्यार्थी यांचा जन्मदिन ★ १८९१ सहकार चळवळीचे प्रवर्तक वैकुंठभाई मेहता यांचा जन्मदिन.★ १९३० प्लेग व कॉलरा प्रतिबंधक लशीचा शोध लावणारे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. वाल्डेमर हाफकिन यांचा स्मृतीदिन★ १९३७ संगीतकार व गायक हृदयनाथ मंगेशकर यांचा जन्मदिन★ १९४७ जम्मू आणि काश्मीरचे राज्य भारतात विलीन झाले.★ १९५४: नाट्य आणि चित्रपट अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्मदिन★ १९९१ स्वातंत्र्यसैनिक, लेखक, पत्रकार, दैनिक ‘मराठवाडा’ चे संपादक, संयुक्त महाराष्ट्र चळवळ व हैदराबाद मुक्तीसंग्रामचे नेते अनंत काशिनाथ भालेराव यांचा स्मृतिदिन.★ आपणा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा…..🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮
*संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक*