नाशिक : प्रतिनिधी
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल , निमा न्यू नासिक आणि एफ पी ए नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने धन्वंतरी पूजन, तसेच राष्ट्रीय आयुर्वेद दिवस ,अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल येथे उत्साहात साजरा करण्यात आला.
धन्वंतरी पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या शुभप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर डॉ सुशील पारख , न्यूरोसर्जन डॉ शेखर चिरमाडे ,सेंटर हेड समीर तुळजापूरकर, निमा न्यू नाशिकचे अध्यक्ष डॉ. दीपक चौधरी, एफ पी ए नाशिकचे अध्यक्ष डॉ.विनय मोगल व इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
निमा न्यू नाशिक व एफ पि ए नाशिक तर्फे यंदाचा धन्वंतरी पुरस्कार डॉ. अजय गुजर व गुरूदेव बिरारी यांना देण्यात आला .दिडशे पेक्षा जास्त सभासदांनी या कार्यक्रमास हजेरी लावली होती.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. स्वादिष्ट अल्पोपहार नंतर प्रत्येक सभासदास बहुमूल्य दिवाळी भेट अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल तर्फे देण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. अजय पाटील व डॉ. अविनाश बाविस्कर व अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे विपणन अधिकारी यांनी परिश्रम घेतले.