. *–II ● विवेक विचार ● II–* आहारासंबंधी काही विधिनिषेध आवश्यक आहेत ज्यायोगे मन अत्यंत पवित्र राहील असाच आहार आपण केला पाहिजे. आहाराचा जीवनाशी काय संबंध आहे हे एखाद्या पशुशाळेत गेल्यास तुम्हाला स्पष्टपणे कळून येईल. आपल्या शरीरात ज्या जा म्हणून शक्ती कार्य करीत आहेत, त्या सर्व आपण ग्रहण केलेल्या अन्नातून उत्पन्न झालेल्या असतात ही आपल्या रोजच्या प्रत्ययास येणारी सामान्य गोष्ट आहे. साधनेच्या प्रथम अवस्थेत आपण आपल्या आहाराविषयी खूप चोखंदळ राहिले पाहिजे.
*स्वामी विवेकानंद…..* *● आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो ●**★ भारतीय सौर जेष्ठ १३ शक १९४४*★ जेष्ठ शुध्द ४★ शालिवाहन शके १९४४★ युधिष्ठिर शक युगाब्द ५१२४ ★ शुक्रवार दि. ३ जून २०२२★ १८९० सरहद गांधी म्हणून ओळखले जाणारे स्वातंत्र्यसैनिक खान अब्दुल गफार खान यांचा जन्मदिन★ १९८४ पंजाबमधिल अमृतसर येथील सुवर्णमंदिरातून खलिस्थानवादी दहशतवाद्यांना बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सेनेने “ऑपरेशन ब्लू स्टार” लष्करी कारवाई केली.★ २०१४ महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांचा स्मृतीदिन★ जागतिक सायकल दिवस.
*संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक*