सोमवार, २३ मे २०२२. वैशाख कृष्ण अष्टमी. वसंत ऋतू. शुभकृत नाम संवत्सर. राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००”आज अनिष्ट दिवस आहे.” आज ‘वैधृती’ योग आहे. चंद्रनक्षत्र – शततारका टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) सौख्य लाभेल. उत्तम आर्थिक प्राप्ती होईल. मन प्रसन्न राहील. प्रतिष्ठा वाढेल. ऐश्वर्य प्राप्ती होईल. वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) अनुकूल दिवस आहे. कामे मार्गी लागतील. जबाबदारी वाढेल. सन्मान मिळतील. मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) भ्रमंती घडेल. अचानक धनलाभ संभवतो. प्रवास कार्यसाधक होतील.कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) ग्रहमान संमिश्र आहे. संयम ठेवा. उपासना करा. आरोग्य चांगले राहील. पथ्य मात्र पाळा. सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) जोडीदाराशी संवाद होऊ शकतो. गैरसमज होऊ देऊ नका. उष्णतेचे त्रास संभवतात. कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अत्यंत उत्तम दिवस आहे. वेळ दवडू नका. चांगले लाभ होतील. प्रतिष्ठा वाढीस लागेल. तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) महत्वाची कामे आज नकोत. मात्र काही सुखाचे क्षण येतील. अनुकूल घटना घडतील. वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संततीकडून सुखद समाचार समजतील. धाडसी निर्णय घ्याल. राजकीय भाष्य टाळा.धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आत्यंतिक सुखाचा दिवस आहे. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. महत्वाची कामे आज पूर्ण करा. मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) शब्दास मान मिळेल. कलाकारांना यश मिळेल. अनपेक्षित घटना घडतील. मन आनंदी राहील.कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अध्यात्मिक लाभ होतील. जीवनाचा अर्थ समजेल. मान सन्मान मिळतील. मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) मनावर ताबा ठेवा. आर्थिक नियोजन करा. तूर्त महत्वाचे करार नकोत.(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)