नाशिक
जिल्ह्यात दिवसभरात ६ जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर मागील चोवीस तासात २ रुग्णांनी करोनावर मात केली.
जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील चोवीस तासात ६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक मनपा क्षेत्रातील ०४ रुग्ण, नाशिक ग्रामीण क्षेत्रातील १ रुग्ण तर जिल्हाबाह्य १ रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आज करोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही. आतापर्यंत जिल्ह्यात करोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या ८ हजार ८९९ इतकी आहे.