नाशिकः भोसला मिलीटरी कॉलेजच्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र शिक्षिका सौ.अंजली प्रशांत हसबनीस आज सेवानिवृत्त झाल्या. त्यानिमित्त महाविद्यालयातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
संस्थेचे नाशिक विभागाचे कार्यवाह सीएमए हेमंत देशपांडे हे प्रमुख पाहुणे होते, त्यांच्या हस्ते श्री व सौ. यांचा स्मृतीचिन्ह,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. श्री.देशपांडे यांनी त्यांना पुढील भावी निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात. यावेळी. संस्थेचे सरकार्यवाह डॉ.दिलीप बेलगावकर, वरीष्ठ महाविद्यालय अध्यक्ष श्री. हेरंब गोविलकर, कनिष्ठ महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ.प्रणव रत्नपारखी यांनी संदेश पाठवत शुभेच्छा दिल्या. भोंसला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उन्मेष कुलकर्णी, डॉ.एस. डी.जोशी, तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षकांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. सौ.हसबनीस यांनी आपल्या भावना व्यक्त करत संस्थेचे आभार मानले व धर्मवीर डॉ.मुंजे याचे स्वतः रेखाटलेले चित्र श्री.देशपांडे यांना प्रदान केला. या कार्यक्रमात काही शिक्षक हे आभासी माध्यमातून सहभागी झाले होते.