चाळीसगाव :
बुलढाणातील मेहकर येथे सारखपुड्यासाठी जाणार्या चाळीसगावच भावी नवरदेवासह दोन जण कार व लक्झरी बस भिषण अपघातात ठार झाले आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मयताचे भाव नवरदेवाच्या भावाचाही समावेश आहे, ही घटना मध्यरात्री घडल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
चाळीसगाव कोर्टात वकिलांकडे कारकूणचे काम करणार योगश विसपुते , त्यांचा भाऊ विशाल विसपुते, आणि सांगवी येथील इंदल चव्हाण व इतर दोन जण, योगश विसपुते यांच्या साखरपुड्यासाठी मेहुकर येथे अल्टो कारने जात असताना, समोरुन येणार्या लक्झरी बसने कारला जोरदार धडक दिली. यात विशाल विसपुते, त्याचा भाऊ आणि सांगवी येथील इंदल चव्हाण यांचा जागीत मृत्यू झाला. तर इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमीना तात्काल औरंगाबाद येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.