निफाड
गरीब परिस्थितीमुळे शाळेची पुस्तके खरेदी करता आली नाही, म्हणून शाळेत गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थिनीस प्रहारच्या दत्तू बोडखे यांनी मदतीचा हात देऊन पुस्तके खरेदी करून दिली. त्यामुळे विद्यार्थिनीस आता शिक्षण घेता येणार आहे.
सविस्तर वृत्त असे की, निफाड तालुक्यातील पिंपळस रामाचे येथील के. के. वाघ विद्यालयाच्या नवव्या वर्गात शिक्षण घेणारी विद्यार्थीनी साक्षी सावळीराम बागुल ही घरची परिस्थिती गरीबीची असल्याने वह्या-पुस्तके विकत घेऊ शकत नसल्याने शाळेत जात नव्हती. शाळेने गैरहजेरीबात पालंकाना पत्र पाठवले होते. कोरोना कालखंडानंतर शाळा नियमित सुरू झाल्या आणि परीक्षा देखील तोंडावर आल्या तरी पुस्तकावाचुन साक्षी बागुल हीची गैरसोय होत होती. या विद्यार्थीनीची
गैरसोयबाबत माहिती दिव्यांग राष्ट्रीय खेळाडू व कोच खंडू कोटकर यांना मिळाली असता त्यांनी ‘प्रहार’ चे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्तू बोडखे यांना अवगद केले. बोडखे यांनी स्वतः या विद्यार्थिनीस वह्या आणि पुस्तके उपलब्ध करून दिले. याप्रसंगी खंडू कोटकर, प्रहारचे शाम गोसावी, रुपेश परदेशी, प्रेम परदेशी आदी उपस्थित होते. शालेय पाठ्य पुस्तकांअभावी शिक्षणासाठी कोणी वंचित असेल तर प्रहार सोबत संपर्क साधण्याचे आवाहन बोडखे यांनी केले आहे.
YOU MIGHT ALSO LIKE