नाशिक : तेल कंपन्यांनी सलग दुसऱ्या दिवशी दरात वाढ केल्याने बुधवारी दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ८० पैशांनी, तर मुंबईत ८५ पैशांनी वाढ झाली. पाच राज्यांतील निवडणुका संपताच तेलाच्या किमती वाढण्यास सुरुवात झाली तर पेट्रोल आणि डिझेलची किंमत विक्रमी १३७ दिवस स्थिर राहिल्यानंतर २२ मार्च रोजी दरात वाढ करण्यात आली.
मुंबईत पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ८५ पैशांनी वाढ झाली. ते १११.६७ रुपये प्रतिलिटर आहे. चेन्नईत पेट्रोल ७५ पैशांनी वाढून १०२.९१ रुपये प्रतिलिटर झाले. कच्चे तेल १०० ते १२० डॉलर प्रति बॅरल राहिल्याने कंपन्यांना वाढ करणे गरजेचे आहे.