इगतपुरी : तालुक्यातील त्रिंगलवाडी येथील माऊंटन शॅडो रिसॉर्टमध्ये शनिवारी (दि. १२) ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून रंगलेली हुक्का पार्टी उधळून लावली होती. यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ५२ पुरुष व २० महिलांना सोमवारी (दि. १४) इगतपुरी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने यातील ५२ पुरुषांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली.
देहविक्रीसाठी महिला पुरविणाऱ्या मुंबईतील दोघा महिलांना १६ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान, देहविक्रीसाठी आणलेल्या १८ महिलांना वात्सल्य होम प्रोटेक्शनमध्ये ठेवण्याची सूचना न्यायालयाने केली. इगतपुरी तालुक्यातील माऊंटन शॅडो रिसॉर्ट मध्ये ही पार्टी झाली होती.