नाशिक : जिल्ह्यातील सातमाळ डोंगररांगेतील ऐतिहासिक महत्व असलेला धोडप म्हणजे चांदवड तालुक्याची शान आहे.निसर्गाच्या कुशीत वसलेला आणि आपल्या शौर्याची व पराक्रमाची यशोगाथा ताठ मानेने सांगणारा हाच धोडप किल्ला पडझड झाल्याने दुर्लक्षित झाला आहे.हा किल्ला पेशवेकालीन आहे.किल्ल्यावरील वेश,तटबंदी महाल, बुरुज यांची मात्र मोठी पडझड झाली आहे. आज (दि.७)रोजी शिवसेनेचे नासिक जिल्हा संपर्कप्रमुख तथा चांदवडचे भुमिपुत्र भाऊसाहेब चौधरी आपल्या सहकार्या समवेत धोडप किल्ल्यावर पाहाणी दौरा केला.
इतका उत्कृष्ट किल्ला पण तितकाच दुर्लक्षित हा किल्ला चढुन गेल्यावर भाऊ चौधरी व सहकार्यांनी शिवमंदिराचे दर्शन करुन संपुर्ण किल्ल्यावर फेरफटका मारुन माहीती जाणुन घेतली.बुरुज ढासललेल्या अवस्थेत,गोड्या पाण्याच्या विहीरी मातीने बुजल्या आहेत,दगडातील पाण्याचे टाके यांची दुरवस्था झालेली आहे.गडाच्या पायथ्यापर्यंत पक्क्या रस्त्याची गरज आहे.माहीतीच्या आधारे खोदकाम केल्यास पुरातन वस्तू जगासमोर येतील,झाडांच्या मुळ्या तटबंदीमध्ये घुसुन तटबंदीला तडे गेलेले आहे.किल्ल्यावर गेल्यावर येणाऱ्या-जाणार्या पर्यंटकांशी स्वताः भाऊ चौधरी यांनी संवाद साधला असता,पर्यटकांनी सुध्दा या ऐतिहासिक किल्ल्याच्या दुरावस्थेसाठी हळहळ व्यक्त केली.तसेच किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवणे,पाय वाटा झाडे- झुडपे तोडुन मोकळ्या करणे,तसेच पायथ्याशी असणारे हट्टी गाव येथील पर्यटन विभागाचे केंद्र आहे, जे बंद अवस्थेत असल्याने व अपुर्या सुवीधा अभावी बंद आहे,ते त्वरीत चालू करुन पर्यटकांसाठी खुले करून स्थानिकांना रोजगाराला चालना मिळेल यासाठी आपण स्वताः पर्यटन मंत्री यांना लवकरच सांगणार आहे.असे भाऊ चौधरी यांनी सांगितले यावेळी त्याचे समवेत चांदवडचे उपजिल्हाप्रमुख नितीन आहेर,तालुकाप्रमुख विलास भवर,उपतालुकाप्रमुख संतोषमोहन व स्थानिक नागरीक ,शिवसैनिक होते.
धोडप किल्ल्याचा पायथ्याशी हट्टी येथील पर्यटन केंद्र , गडाकडे येणारे रस्ते,पायवाटा यांचा विकास करण्यासाठी व गडाचे पुरातत्व खात्याकडुन डागडुगी करण्यासाठी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करणार त्याच अनुषंगाने आज सहकार्यांसह किल्ल्यावर जाऊन संपूर्ण पाहणी केली लवकरच शिवसैनीकासह जाऊन स्वछता करणार. भाऊसाहेब चौधरी, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख.