info about insurance and types of insuranse
सध्या दूरचित्रवाणी असो की सोशल मीडिया आणि कोणतीही बँक यासह अनेक ठिकाणी तुम्हाला मोठ्या प्रमाणात एकच जाहिरात दिसेल ती म्हणजे विमा (insuranse) आणि जसा कोरोनाने जगात थैमान घातले त्यांनतर या जाहिरातीही वाढल्या आणि या विषयाकडे लोकांचा गांभीर्याने बघण्याचा दष्टीकोनही.कारण आपण कर्ता व्यक्ती आज कमावतो आहे.सारे काही सुरळीत सुरू आहे पण भविष्यात पुन्हा एकदा दुर्दैवाने कोरोना किंवा आरोग्य, अपघात अन्यथा मृत्यु झाला तर कुटुंबाला त्याचा आर्थिक त्रास होउ नये यासाठी इन्शुरन्स हा सर्वोत्तम पर्याय आहे मात्र तो घेतांना आपल्याला त्याची सर्व माहिती असेल तर नक्कीच योग्य विमा निवडून आपले कुटुंब सुरक्षित ठेवू शकतो.यासाठी जाणून घेऊया विमा म्हणजे काय आणि वीमाचे प्रकार .( what is insuranse and type of insuranse )
विमा म्हणजे काय? what is insuranse ?
विमा म्हणजे तुम्ही आज ज्या पैशांची गुंतवणूक कराल त्या मोबदल्यात तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे आजारपण,अपघात, मृत्यु झाल्यानंतर कंपनी तुम्हाला विम्याची रक्कम देते. उदा.तुमचे कपड्याचे दुकान आहे.त्या दुकानाला दुर्देवाने आग लागली आणि तुमचा दोन कोटींचा माल जळाला. त्याआधी जर तुम्ही दुकानाचा आणि त्या मालाचा विमा काढला असेल तर वीमा कंपनी नियमाप्रमाणे तुम्हाला रक्कम परत देऊ शकते आणि तुमच्या जीवनात काही काळापुरते आलेले हे संकट काही महीन्यात दुर होऊ शकते.
दुसरे उदाहरण म्हणजे आरोग्य वीमा . ( health insuranse )
जग वेगवान झाले आणि त्याच वेगाने आरोग्याच्या समस्या वाढल्या त्यामुळे घरातील कोणत्या सदस्याला कधी काय आजार होईल किंवा अपघात होईल याची शाश्वती नाही. आणि कोणत्याही रूग्णालयात २४ तास रुग्ण दाखल झाला तरी बिलाचा आकडा डोळे फाडणारा असतो त्यामुळे आरोग्य वीमा सर्वात गरजेची वस्तू बनली आहे. त्यातून चांगल्या हॉस्पीटल मध्ये तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत उपचार तुम्ही घेऊ शकतात आणि आरोग्य विमा असल्याने कुटुंबाला होणारा मानसिक आणि आर्थिक त्रास टळू शकतो.
विम्याचे प्रकार ( types of insuranse )
१) जीवन वीमा ( life insuranse )
२) आरोग्य विमा ( health insuranse )
३) गृह वीमा ( home insuranse )
४) वाहन विमा ( vehicle insuranse )
५) प्रवास वीमा ( travel insuranse )
६) अपघात विमा ( accidental insuranse )