नाशिक शहरात नागरिकांच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन, संरक्षणासाठी नाशिक महानगरपालिका कृती दलाच्या माध्यमातून पुढाकार घेत आहे. पर्यावरण समिती सदस्यांनी विविध संघटनांच्या 15 प्रतिनिधींची नावे पर्यावरण संवर्धन कृती दलासाठी माननीय आयुक्त नाशिक महानगरपालिका यांना आज निवेदनाद्वारे देण्यात आले. उद्यान उपायुक्त श्री शिवाजी आमले यांना निर्देश देऊन पर्यावरण कृती दलाची लवकरच स्थापना करण्याबाबत आयुक्तांनी जाहीर केले. शहरात अनेक संघटनांच्या एकत्रीकरणातून पर्यावरण संवर्धन समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. समितीच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक नागरिकास पर्यावरण संवर्धनाचे काम करणे आता सोयीचे होणार आहे. समिती पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करून अधिकाधिक नागरिकांना पर्यावरण संवर्धनात सहभागी करीत आहे. समिती व महानगरपालिकेच्या एकत्रित प्रयत्नातून पर्यावरण संरक्षणाचे महत्त्वपूर्ण कार्य साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री यांनी नुकतेच पर्यावरण प्रेमींच्या निमंत्रणाला मान देऊन वटवृक्षाची भेट घेतली. पर्यावरण समितीने या वेळेस माननीय पर्यावरण मंत्र्यांना नाशिक मधील पर्यावरण संरक्षणासाठी महानगरपालिके बरोबर नागरिकांचा सहभाग याबाबत निवेदन दिलेले होते. माननीय आयुक्तांनी ही समितीच्या कार्याची दखल घेऊन उपायुक्तांच्या माध्यमातून लवकरच कृती दलाची स्थापना केली जाईल असे आज घोषित केले.
याप्रसंगी पर्यावरण समिती सदस्य ह-भ-प दुसाने, भारती जाधव, कोठावळे ताई, मनोज साठे, निशिकांत पगारे,चंद्रकिशोर पाटील, अमित कुलकर्णी,संदीप भानोसे, जयेश पाटील,संतोष रेवगडे, प्रशांत लोणारी, मनीष बाविस्कर इत्यादी उपस्थित होते.