सायखेडा खेरवाडी -चांदोरी रस्त्याने भरधाव वेगाने धावणाऱ्या स्विफ्ट कारवरील ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या किराणा दुकानात घुसली. किराणा दुकानातील मालाचे मोठे नुकसान झाले आहे सुदैवाने कोणती जीवितहानी झाली नाही. खेरवाडी रस्त्यावर चांदोरीकडे एम एच 15 एच एम 558 स्विफ्ट कार वेगात धावत आली. गिरणारे येथील राहुल भोर ही कार चालवत होते. त्यांचा कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या विठ्ठल किराणा अँड जनरल स्टोअर या दुकानात शिरली. कार इतकी वेगात आली की दुकानातील काउंटर आणि सामान बाहेर फेकले गेले, भोर यांनी गाडी तेथेच ठेऊन पळ काढला तर चालक दारूच्या नशेत गाडी चालवत असल्यामुळे ताबा सुटल्याचा अंदाज प्रत्यक्षदर्शींनी येथील उपस्थितांकडून सांगण्यात आला. मात्र हा सर्व थरार शेजारच्या दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. यारोडवर नेहमीच वेगाने चार चाकी वाहने मार्गक्रमन करत असतात ही वाहने वेगाने चालणा-या वाहनचालकांच्या गाडीचा वेग कमी करण्याकरीता येथील बरेच ठिकाणी स्पिडब्रेकर आहेत पण ते नावापुरताच किंवा जेथे आहे ते भरपुर उंच व वेगाने चालणा-या गाडीसाठी धोके दायक ही अशा घटना रोडवर होऊ नये याकरिता प्रशासनाकडून कोणती काळजी घेण्यात येईल याकडे येथील नागरिकांचे लक्ष लागून आहे.