ज्ञान हे चकमकीच्या दगडातील अग्नीप्रमाणे मनामध्ये वसत असते. उद्दीपक कारणरुपी आघाताने ठिणगी निघून ते प्रकट होते. कोणीही कोणाला शिकवत नसतो. आपल्यापैकी प्रत्येकाला स्वतःच स्वतःला शिकवावयाचे आहे. शिक्षक अथवा आचार्य यांचे काम केवळ उद्दीपक करणे होय, या बाह्य उद्दिपक आणि आमच्यातील अंतस्थ शक्ती आम्हाला साऱ्या गोष्टी समजावून देण्यासाठी जागा होत असते.
स्वामी विवेकानंद...
● आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो ●
★ भारतीय सौर २२ अग्रहावन शक १९४३
★ मार्गशीर्ष शुध्द १०
★ शालिवाहन शके १९४३
★ युधिष्ठिर शक युगाब्द ५१२३
★ सोमवार दि. १३ डिसेंबर २०२१
★ १९८६ हिंदी चित्रपट अभिनेत्री खान्देश कन्या स्मिता पाटील यांचा स्मृतीदिन
★ १९९४ वारणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक श्री. विश्वनाथ आण्णा उर्फ तात्यासाहेब कोरे यांचा स्मृतीदिन
★ २००१ भारताच्या संसंद भवनावर दहशतवादी हल्ला
★ २००५ हिंदी चित्रपट निर्माते, निर्देशक, रामायणकार रामानंद सागर यांचा स्मृतीदिन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक