[et_pb_section bb_built=”1″][et_pb_row][et_pb_column type=”4_4″][et_pb_text _builder_version=”3.9″]
अंदमान – अंदमान द्वीप येथे हत्या झालेले अमेरिकेतील ख्रिस्ती धर्मप्रसारक जॉन अॅलेन चाऊ हे द्वीपावरील आदिवासींमध्ये ख्रिस्ती धर्माचा प्रचार (म्हणजेच धर्मांतर) करण्यासाठीच गेले होते, असे त्यांच्या नोंदवहीतील नोंदीतून स्पष्ट झाले आहे. अंदमानमधील सेंटिनल बेटावरील आदिवासींमध्ये ख्रिस्ती धर्माचा प्रचार करण्यासाठी गेलेले जॉन चाऊ यांची आदिवासींनी २० नोव्हेंबर या दिवशी हत्या केली. चाऊ हे पर्यटक म्हणून भारतात येत असत अन् येथे ख्रिस्ती धर्माचा प्रचार करत, असेही उघड झाले आहे. ते यापूर्वी ५ वेळा सेंटिनेल बेटावर येऊन गेले आहेत. यापूर्वी चाऊ यांनी १४ नाव्हेंबरला सेेंटिनल बेटावर जाण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी बेटावरील आदिवासी समाजातील काही लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला; मात्र चाऊ यांना पहाताच बेटावरील आदिवासी चांगलेच संतापले. त्यांनी जॉनच्या दिशेने एक तीक्ष्ण बाणही सोडला. हा बाण चाऊ यांच्या हातात असलेल्या बायबलला लागला. यानंतर चाऊ यांनी हा प्रसंग त्यांच्या नोंदवहीत ‘माझ्या हातात असलेल्या बायबलमुळे माझे प्राण वाचले’, अशा शब्दांत लिहून ठेवला आहे. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना ‘माझी हत्या झाल्यास त्या आदिवासींना क्षमा करा’, असे सांगून ठेवले होते.
[/et_pb_text][/et_pb_column][/et_pb_row][/et_pb_section]