नाशिक : दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा मुद्राय युवा फाऊंडेशन व शिवांजली युवक मित्र मंडळ यांच्या तर्फे दिपावली निमित्ताने सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये अनाथआश्रम, आदिवासी पाडे, सिग्नल वर फुगे किंवा इतर वस्तू विक्री करणारे बांधव यांना दिवाळी फराळ, तसेच थंडी साठी ब्लँकेट वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमात सामील होण्याचे आवाहन मुद्राय चे अध्यक्ष नितिन देवरे यांनी केले आहे. जर मुद्राय च्या या उपक्रमात सामील होता येत नसेल तर आपण राहत असलेल्या ठिकाणी स्वतःहून सामाजिक कार्य करून दिवाळी साजरी करा असे देखील नितिन देवरे यांनी स्पष्ट केले.
मुद्राय तर्फे प्रत्येक सण सामाजिक कार्य करून साजरा केला जातो त्याचप्रमाणे ही दिवाळी सुद्धा अश्याच कार्याने साजरी करू असे मुद्राय च्या सदस्यांनी सांगितले. जळगाव, नाशिक, कल्याण, पनवेल, सटाणा, मुंबई या ठिकाणी हा उपक्रम साजरा होणार आहे. निरंजन पाटील, विपुल भामरे, नंदा पवार, अवधूत करंजकर, प्रियांका करंजकर, गायत्री सूर्यवंशी, कविता पाटील, निलेश तांबुसकर, राकेश दुर्वे, करुणा देवरे, स्वरूप वाघ, निलेश नेहते तसेच मुद्राय च्या इतर पदाधिकारी किंवा 9822779195 या क्रमांकावर संपर्क साधावा. दिपावली साजरी करतांना कोविड – 19 ची तिसरी लाट येणार नाही याची काळजी नागरिकांनी घ्यावी अशी विनंती नितिन देवरे यांनी केली.