Two persons were injured in a clash between two groups in Wadala village and a case has been registered against them at Indiranagar police station. नाशिक (दि.१९)वडाळा गावात दोन गटात तुफान हाणामारी झाली यात दोन जण जखमी झाले असून या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करून दोन्ही गटातील संशयितांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी हुसेन शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून दानिश रौफ शेख, रौफ शेख , सलीम शेख, नईम शेख, सर्व रा. माळीगल्ली वडाळा गाव या संशयितांना अटक करण्यात आली आहे सदर संशयितांना शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याने . मंगळवारी टोळक्याने तलवारीने हल्ला केला. दानिश शेख याने तक्रारदार यांचा भाऊ बंटी याच्यावर वार करत असताना तक्रारदार हुसेन शेख यांनी तो वार हातावर घेतल्याने ते जखमी झाले तसेच हुसेन शेख शौकत शहा ,अजय रायकर, बंटी उर्फ अकील शेख यांनी आपले घर गाठून सद्दाम च्या वादात सद्दाम याची बाजू का घेतली या कारणावरून टोळक्याने शिवीगाळ करत धारदार शस्त्र वापरून वाद घातला आणि तुझा बेत पाहतो अशी धमकी देत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या हाणामारीत हुसेन शेख याने धारदार हत्याराने तर शौकत शहा यांनी लोखंडी रोड ने मारहाण केल्याने यात सलीम शेख जखमी झाला असून या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला असून. पुढील तपास सहाय्यक उपनिरीक्षक हादगे करीत आहेत.