दसक बिटको रोडवर दुभाजकावर आदळून दुचाकीस्वार ठार
नाशिकः भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात चालक ठार झाल्याची घटना दसक – बिटको रोडवर सोमवारी (दि.२४) दुपारी घउली.
विशाल संजयसिंह राजपुत (२४, रा. ओमनगर, सैलानीबाबा जेलरोड) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार राजपुत हा सोमवारी दुपारी दसकच्या दिशेने बिटकोकडे जात असताना त्याची दुचाकी सैलानी बाबा चौक येथे दुभाजकावर आदळून तो गंभीर जखमी झाला होता. त्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीसांत नोंद करण्यात आली आहे.